सर्वधर्मसमभावाचा संदेश; गळाभेट घेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
मोहपा, दि. २६ : मुस्लिम समाजाचा पवित्र व महत्त्वाचा धार्मिक सण ईद-ए-मिलादुन्नबी मोहपा येथे बुधवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्वधर्मसमभाव, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.
ईद-ए-मिलादुन्नबी हा पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जीवनकार्याचा, शिकवणीचा आणि विचारांचा स्मरण करून शांतता, प्रेम, दया, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जातो.
या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून नमाज, कुराण पठण, प्रार्थना तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गरजू व्यक्तींना मदत, अन्नदान आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्यासही विशेष महत्त्व देण्यात आले.
‘ईद-ए-मिलाद हा केवळ जन्मदिनाचा उत्सव नसून प्रेम, शांतता, मानवता आणि बंधुभावाची शिकवण आचरणात आणण्याचा दिवस आहे,’ अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नबी शेख (सदर अध्यक्ष), अयुफ शेख, जमशेर शेख, अफसर शेख, असलम भाई, नजीर भाई, रमजान पटेल, शकील भाई, गन्नी शेख, शाबीर शेख, जमील शेख आणि मतीन कुरेशी यांनी परिश्रम घेतले.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I भूषण सवाईकर : 📲 9764507440









