मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर

पीएमश्री नगर परिषद शाळा, मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

मोहपा : पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, मोहपा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुशी नेरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कावेरी ढोबळे, अहाना लांजेवार, मुख्याध्यापक मोहन चतूर, प्रदीप विघ्ने आणि वनिता काकडे उपस्थित होते.

 

या प्रसंगी प्रदीप विघ्ने, रत्नमाला मांडवकर, वनिता काकडे, वैशाली गणोरकर, खुशी नेरकर, कावेरी ढोबळे आणि अहाना लांजेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र व कार्यावर प्रकाश टाकला.

इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच एकता भुसारी, पूर्वा नेरकर, पूर्वा ढाले, आशिमा निमकर, श्रद्धा भोयरकर, शुभ्रशी डोंगरे, संस्कृती लाड, हर्षिका श्रीखंडे, साक्षी श्रोते, अनुष्का रेवस्कर, दूर्वा हिरटकर, मैत्री गौरखेडे, आराध्या श्रीखंडे, युक्ती बेलसरे आणि जैनब अली या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली.

यावेळी Rotary Club of Nagpur Vision यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले स्पोर्ट्स टी-शर्ट सर्व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. या उपक्रमात डॉ. अमित चेडे (वैद्यकीय अधिकारी), मकबूल कुरेशी (जनआरोग्य समिती सदस्य), दत्तराज पोतले (सार्वजनिक बांधकाम विभाग), श्रीकांत खडस्कर आणि रिमेश वानखेडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी श्रीखंडे हिने केले, तर आभार प्रदर्शन रूचिका राऊळकर हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिना शेख, सुवर्णा श्रोते, राजेश वानखेडे आणि विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.

👉 विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

0
0

Leave a Reply

Realted News