वृद्ध पालकांच्या देखभालीसाठी तेलंगणात नवा कायदा
वेतनातून कपातीची तरतूद
हैदराबाद : ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षितता आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी तेलंगण विधानसभेने रविवारी ‘तेलंगण कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार देखरेख विधेयक, २०२६’ एकमताने मंजूर केले.
या विधेयकाचा मुख्य उद्देश वृद्ध माता-पित्यांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करणे हा असून, सरकारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार तसेच लोकप्रतिनिधींनाही आपल्या पालकांचा सांभाळ करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कायद्यांतर्गत पालकांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित व्यक्तीच्या पगारातून १५ टक्के किंवा १० हजार रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) कपात केली जाईल. ही रक्कम थेट संबंधित पालकांना देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0