शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

प्रकृतीबाबत तपासणीनंतरच स्पष्टता – सुप्रिया सुळे

पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष Sharad Pawar शरदचंद्र पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयी स्पष्ट माहिती देण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

मागील महिन्यातही शरद पवार यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांची बारामती येथे सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार या सभेला उपस्थित राहणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कुटुंब म्हणून सभेला उपस्थित राहणार – सुळे

                 सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिकरित्या फोन करून सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. “कुटुंब म्हणून मी या सभेला जाणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे. मात्र, महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांशीही मी याबाबत चर्चा केली असून त्यांनीही यास सहमती दर्शवली आहे,” असे त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीने या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

0
0

Leave a Reply

Realted News