सावरडोह येथे जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सावरडोह : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरडोह येथे ११ एप्रिल २०२६ रोजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावरडोहचे सरपंच निलेश मरस्कोल्हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जयवंतराव खळतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विना धावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुदाम मोहिते, सुरेश गुडधे, बाबाराव जाधव, धनराज धंडाळे, जयवंतराव मोहिते, केशवराव चोपडे, भाऊराव धंडाळे, विजयराव गुडघे, गोपालराव मोहिते, डॉ. मोहन मोहिते, सुनील भुजाडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलची आपुलकी व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी शाळेसाठी उदारहस्ते देणग्या व बक्षिसे जाहीर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नंदकुमार चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन रेखा मोहुर्ले यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल मोहिते, राजेश गाडरे, गजानन धुर्वे, सुमित चोपडे, अमोल धंडाळे, शरद ढोले, ऋषिकेश रणनवरे तसेच गुरुदेव सेवा मंडळ, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सहकार्य लाभले.
प्रवेशासाठी घरपट्टी माफीची घोषणा
या वेळी सरपंच निलेश मरस्कोल्हे यांनी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, इयत्ता पहिलीत जिल्हा परिषद शाळा सावरडोह येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरपट्टी कर माफ करण्यात येईल. या घोषणेचे उपस्थितांनी स्वागत केले.









