शिवसेनेतर्फे ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांना अल्पोपहार वाटप
का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने कारंजा शहरात मुस्लिम बांधवांकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे शहरातील प्रमुख जयस्तंभ चौक परिसरात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. रॅलीत सहभागी झालेल्या मुस्लिम समाजबांधवांसाठी शिवसेनेतर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
कारंजा शहरात अनेक दशकांपासून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सलोख्याचे आणि बंधुभावाचे संबंध आहेत. ही सामाजिक एकता आणि परस्पर सौहार्द भविष्यातही कायम राहावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नितीन दर्यापुरकर, भगवान बुवाडे, नरेश चाफले, टीकाराम मस्के, संजय मस्के, राजेंद्र लाडके, योगेश चौधरी, कमलेश कठाणे, विशाल इंगळे, गजानन भिलकर, हेमंत बनगरे, प्रवीण ढबाले, सतीश इंगळे, राहुल खोडे, सुजित चौधरी, चेतन ऐकापुरे यांच्यासह समस्त शिवसैनिक उपस्थित होते.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि हिंदू-मुस्लिम एकतेचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईलवर, थेट आपल्या गावातून
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I परमानंद मुदगल : 📲 9028162217









