December 1, 2025 6:26 am

“गणपती बाप्पा मोरया!” …

ॐ श्री गणेशाय नमः।

                         सद्गुणांचा सागर, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता-दुःखहर्ता, गजमुखधारी, विघ्नहर्त्याच्या मंगलमय स्वागताचा महाउत्सव — गणेशोत्सव — आपल्या महाराष्ट्रभूमीवर पुन्हा एकदा आनंद, भक्ती, आणि सौहार्दतेची बरसात घेऊन आला आहे.

                       आज प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वेशीत आणि प्रत्येक हृदयात आनंदाची लहर उसळली आहे. शंखध्वनी, ढोल-ताशांचा गजर, आणि आरत्यांच्या मधुर स्वरांनी वातावरण भारले आहे. फुलांनी सजलेल्या मंडपांत, रंगीबेरंगी रोषणाईत, आणि भक्तांच्या नतमस्तक भक्तीभावात आज बाप्पाचं भव्य स्वागत होत आहे.

                       हे विघ्नहर्ता, तुज येण्यानं सृष्टीतच नवचैतन्य संचारलं आहे! घराघरात प्रसन्नतेचा दरवळ पसरला आहे. तुझ्या आगमनाने या जगातल्या प्रत्येक अडथळ्यावर, प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते.

                       या पावन प्रसंगी, आपल्या सर्वांच्या अंत:करणातून एकच गर्जना ऐकू येते – “गणपती बाप्पा मोरया!” …“गणपती बाप्पा मोरया!”….

                       या मंगलमय प्रसंगाचं औचित्य साधून, आपल्या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत करत आहे. चला, एकत्र येऊन, भक्ती, संस्कृती आणि समरसतेचा हा उत्सव हर्षोल्हासात साजरा करू या!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News