December 1, 2025 7:01 am

जीएनआयटी, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन

जीएनआयटी, नागपूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन 

७१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

काटा वृत्तसेवा I भूषण सवाईकर
नागपूर: राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) च्या अंतर्गत, गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (जीएनआयटी), दहेगाव, नागपूर येथे  ‘ रक्तदान शिबिर ’ अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन‘आयुष ब्लड बँक, नागपूर ’ यांच्या सहकार्याने जीएनआयटी कॅम्पसच्या टी२ इमारतीत करण्यात आले होते.
                      या शिबिरात ७१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या सेवा आणि करुणेच्या भावनेने हे शिबिर अधिक अर्थपूर्ण ठरले.
                      या उपक्रमाचे समन्वयन जीएनईएसचे संचालक आणि जीएनआयटीचे प्राचार्य डाॅ. सुधीर एन. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सतीश एस. मरकड आणि अतिरिक्त सह-अभ्यासक्रम प्रभारी प्रा. तुषार सी. बोरकर यांनी केले. शिबिराच्या प्रारंभी प्राचार्य सरांनी केलेल्या प्रेरणादायी भाषणात,’ रक्ताचा एक थेंबही जीव वाचवू शकतो,’ एखाद्याच्या कथेत नायक बनू शकतो,  या शब्दांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी उद्युक्त केले.

                     या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या नेतृत्वाकडून मिळालेला पाठिंबा व प्रेरणेसाठी सरदार नवनीत सिंग तुली (सीएमडी, जीएनईएस), सरदारनी तनप्रीत तुली (एमडी, जीएनईएस) आणि सरदार रबजोत सिंग तुली (कार्यकारी संचालक, जीएनईएस) यांचे सहकार्यासाठी उपक्रमाचे आयोजकांनी विशेष आभार मानले.
                    आयोजकांनी या उपक्रमाला यशस्वी बनवणार्या सर्व स्वयंसेवक, रक्तदाते, आयोजक आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच ज्यांनी अत्यंत व्यावसायिक आणि सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन प्रक्रिया पार पाडणारे ‘आयुष ब्लड बँक’ चे प्रमुख डाॅ. संजय बारागवणे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचेही आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

                    अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक जबाबदारी आणि मानवतावादी मूल्यांबद्दलही दृढ वचनबद्ध असल्याचे स्पष्ट होते. या सामाजिक उपक्रमास विद्यार्थ्यांकडून तसेच प्राध्यापकवर्गाकडून उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News