अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला;

आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. वडगाव पान येथे शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना सहावीतील विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

                        प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मुलगी घरी जात असताना एका युवकाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. मुलीच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

                        जखमी विद्यार्थिनीला तत्काळ लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

                        यापूर्वीही संगमनेर तालुक्यात एका तरुणीवर हल्ल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News