ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम; जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

ठाणेगावात पोलिसांचा संवाद उपक्रम;

जनजागृतीसह UPSC यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल

ठाणेगाव : कारंजा पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेगाव येथे जनजागृती व समाजप्रबोधनासाठी ‘संवाद उपक्रम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

श्री लक्ष्मण गिर गोसावी देवस्थान येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हादजी मदन यांच्या हस्ते करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी उपस्थितांना विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केले. समाजप्रबोधनातून नागरिकांना योग्य दिशा देण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाला गावातील महिला, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. ट्रस्टचे अध्यक्ष गोविंदराव धंडाळे, सचिव रमेश नागतूरे, रमेश चाकोरे, प्रदीप सावरकर यांच्यासह इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

यावेळी नुकतेच UPSC परीक्षेत यश मिळवलेले ठाणेगावचे प्रज्वल नासरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव पांडे, पोलीस पाटील सुभाष चरडे, वासुदेव कांमडी, जीवन चरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायकराव भांगे यांनी केले.

0
0

Leave a Reply

Realted News