संतश्री सेनाजी व नगाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

संतश्री सेनाजी व नगाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर

नागपूर :  महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा तसेच संत नगाजी महाराज मठ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २७ मार्च २०२६, शुक्रवार रोजी दारोडकर चौक, नागपूर येथील नगाजी महाराज मठात अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

                          प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान म्हणून सौ. मंजुषाताई व श्री. राजेंद्रजी फुलबांधे तसेच सौ. स्वातीताई व श्री. वैभवजी तुरक विराजमान होते. त्यांच्या हस्ते होम-हवन तसेच दही, दूध आणि पंचनद्यांच्या पवित्र जलाने मूर्तींचा अभिषेक करण्यात आला. मूर्तींचे विधीवत पूजन झाल्यानंतर संतांच्या जीवनचरित्रावर आधारित ताळ-मृदंगाच्या गजरात भजन कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर दहीहांडी व गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात पार पडला.

                           या ऐतिहासिक सोहळ्यास नगरसेवक सर्वश्री बंडु राऊत, कल्पक भणारकर, तुषार लारोकर तसेच सौ. वैशाली उदापूरकर यांनी उपस्थित राहून संतांचे दर्शन घेतले व शुभेच्छा दिल्या. या क्षणाचे साक्षीदार म्हणून अंबादास पाटील, पुरुषोत्तम मिरासी, श्याम आस्करकर, राजेंद्र इंगळे, रमेश लाकुडकर, शंकर वाटकर, सुरेश अतकरे, राजू चिंचाळकर, नाना जांभुळकर, राजेंद्र येस्कर, सौ. हिरा बोरकर, श्रीमती मालती अमृतकर, श्रीमती अर्चना कडू, सौ. मंजुषा पाणबुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

                           उपस्थित प्रमुख मान्यवरांचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमस्थळी नाभिक समाजातील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले, हे विशेष उल्लेखनीय ठरले. दहीकाला कार्यक्रमानंतर महाप्रसाद व रुचकर भोजनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

                           या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व विभागीय पदाधिकारी, महिला आघाडी, संत नगाजी महाराज मठ समिती तसेच सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

0
0

Leave a Reply

Realted News