काटा वृत्तसेवा I डॉ. प्रशांत महाजन
महात्मा ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती उत्साहात साजरी
कळमेश्वर : भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मागास वर्ग, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि सत्यशोधक समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतीराव फुले यांची १९९ वी जयंती स्थानिक संत सावता मंदिर, कळमेश्वर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. शीतल कांडलकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी प्रेमकुमार बोबडे होते. यावेळी बोबडे यांनी ओबीसी जनगणना आणि जातीनिहाय जनगणनेच्या गरजेवर भाष्य करत समाजाच्या प्रगतीसाठी तिचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रा. अरुण रत्नपारखी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा आढावा घेतला. तसेच प्रा. राहुल हिवराळे यांनी शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी फुले यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. विक्की बेलखोडे आणि विजय राजूरकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान शपथविधीने झाली. ईश्वर कुरळकर यांनी उपस्थितांना शपथ दिली. “मी सावित्री” या विषयावर मीना राजेंद्र ढवळे यांनी एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

यावेळी डॉ. प्रशांत रमेशराव महाजन यांना राज्यस्तरीय सत्यशोधक “गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिनेश गजभिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता बोडखे यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

नियोजन समिती मध्ये मीना ढवळे, संगीता सूर्यवंशी, ममता राजूरकर, वंदना गजभिये, लता बागडे ,लक्ष्मी वानखडे, ज्योती कुरडकर, योगिता गजभिये, मंजुषा कोटकर , मंजुषा निस्ताने, अरुणा डांगोरे, छत्रपती वानखडे, बबनराव पाटील, दीपक मेश्राम, मोरेश्वर जांभुळकर, युवराज डोंगरे, अविनाश मेश्राम, पुंडलिक बोरकर, शुद्धपाल गजभिये, अविनाश बोरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राजेंद्र ढवळे, अनिल बोडखे यांच्यासह नियोजन समितीतील सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले.











