विदर्भात उष्णतेचा कहर, तीन दिवस उष्णतेची लाट राहणार
चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक तापमान ४५.८ अंश नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) चंद्रपूरमध्ये कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. सोमवारी येथे ४५.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. …