CENSUS : जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी

तारसा ग्रामपंचायतीचा जनगणनेवर बहिष्कार

का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे

मौदा : आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात आलेला नसल्याच्या निषेधार्थ मौदा तालुक्यातील तारसा ग्रामपंचायतीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ग्रामसभेनंतर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांना निवेदन सादर करून ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमची तरतूद करण्याची मागणी केली. तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेही या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी सरपंच वैशाली लेंडे, उपसरपंच चंद्रशेखर गभणे, ग्रामपंचायत सदस्य शुभम गभणे, संगीता डहाके, जनार्धन येळणे, पल्लवी मोटघरे, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णाजी मोटघरे यांच्यासह ओबीसी समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी समाजाची स्वतंत्र व अचूक लोकसंख्या नोंदविण्यासाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, अन्यथा जनगणनेवर बहिष्कार कायम ठेवण्याचा इशाराही ग्रामसभेत देण्यात आला.

0
0

Leave a Reply

Realted News