पुलाच्या बांधकामासाठी विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चक्काजाम; सहा तास वाहतूक ठप्प
कारंजा घाडगे : कारंजा–माणिकवाडा मार्गावरील सावरडोह येथील खडक नदीवरील पुलाची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले. सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत रस्ता रोखून धरल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प होती.
पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने सावरडोह, खापरी, बेलगाव, सुंसुंद्रा, माणिकवाडा आदी गावांचा संपर्क तुटतो. याचा फटका विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचा मालवाहतूक आणि रुग्णांच्या उपचारांवर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पुलासाठी दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही बांधकाम सुरू न झाल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप भिसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अखेर प्रशासन व बांधकाम विभागाने येत्या २० तारखेपासून पुलाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम मागे घेण्यात आला. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक व शिवसैनिक सहभागी झाले होते, अशी माहिती सरपंच स्वप्निल खवशी यांनी दिली.











Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0