जिल्हा प्रेरणा मेळावा :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नागपूर जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन प्रक्रिया आज
नागपूर, दि. २३ मे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हास्तरीय ‘जिल्हा प्रेरणा मेळावा’ आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची पुनर्बांधणी आणि आगामी दोन वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.
हा मेळावा आज सकाळी १०:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रतिनिधित्व नोंदवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध शाखांच्या कामाचा आढावा, पुढील कार्यदिशा आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. प्रत्येक शाखेकडून कार्य अहवाल सादर करण्यात येणार असून, संघटनात्मक चर्चेद्वारे नव्या नेतृत्वाची निवड केली जाणार आहे.
यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाह केलेल्या लखन (लक्ष्मण) आणि माहेश्वरी यांचा विशेष सत्कार देखील करण्यात येणार आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, ही बैठक मुख्यतः पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी असून सर्व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहून निवड प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
रामभाऊ डोंगरे – 9404084033
विजयाताई श्रीखंडे – 9527582209
देवयानी भगत – 9423064398
देवानंद बडगे – 7410060727
इंजी. गौतम पाटील – 8530274301
चित्तरंजन चौरे – 9422906264
डॉ. सुनील भगत – 9423064391
– चित्तरंजन चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर









