गोंगो पूजन अन् ध्वजारोहणातून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन!

कन्हानच्या पिपरीत जयंती सोहळा उत्साहात; आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे घडले दर्शन

का टा वृत्तसेवा | किशोर वासाडे 

कांद्री (कन्हान) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कन्हान येथील पिपरी रोड परिसरात पारंपरिक गोंगो पूजन, ध्वज पूजन आणि ध्वजारोहणाने अभिवादन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या सोहळ्यातून आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले.

दोन संस्थांचा संयुक्त पुढाकार

बिरसा मुंडा गोंडवाना बहुउद्देशीय संस्था, कन्हान (पिपरी) आणि बिरसा मुंडा सेवा समिती, कन्हान (पिपरी) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कन्हानच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे आणि कन्हान युथ फाउंडेशनचे कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पारंपरिक गोंगो पूजनाने सोहळ्याची सुरुवात

यानंतर रामलाल पट्टा आणि वंदना पट्टा या दांपत्याच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने गोंगो पूजन व ध्वज पूजन करण्यात आले. आदिवासी समाजबांधवांनी पारंपरिक रीतिरिवाजांनुसार पूजा-अर्चना आणि सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सुखलाल मडावी, सोनू मसराम, पत्रकार सूर्यभान फरकाडे, पवन सरोदे, अमित बेलसरे आणि चेतमणी मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना नमन करताना मान्यवर आणि आदिवासी समाजबांधव.

बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, त्यांचे बलिदान आणि सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

या सोहळ्याच्या माध्यमातून आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख, पारंपरिक श्रद्धा, संघटनशक्ती आणि महापुरुषांप्रती असलेला आदरभाव अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सामूहिक प्रयत्न

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सूरज वरकडे, मोहन वरकडे, जयराम कोरवते, शालू कोडवते, संगीता वरकडे, सीमा वरकडे, भूमिता परतेकी, आकाश भगत, रमेश इडपाते, अनिल पंधराम, चंद्रभान वरखडे, ओमप्रकाश वरकडे, दिलीप मस्के, समीर मसराम, विनोद वाढवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो ओळी :
१. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करताना पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे व कॅप्टन सतीश बेलसरे.
२. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना नमन करताना मान्यवर आणि आदिवासी समाजबांधव.


📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून

किशोर वासाडे : 📲 9423403810

0
0

Leave a Reply

Realted News