पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश

यातून आपली यंत्रणा किती गाफील हे स्पष्ट होते- जयंत पाटील

सांगली : पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

                       जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते.

हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे

                      जयंत पाटील म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला विषयावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावी. हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक

                      जयंत पाटील म्हणाले की, दहशतवादी सहजपणे मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी पोहोचतात. निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक वाटते. लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना सीमेहून देशाच्या आताली भागात 300 किलोमीटर अंतरापर्यंत देखील हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज असायला हवा होता.

                     जयंत पाटील म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 400 पारची घोषणा करणाऱ्या भाजपला 250 जागांचाही आकडा गाठता आला नाही. परिणामी नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू आणि अन्य लोकांना सोबत घेऊन भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. तर, नोव्हेंबर 2024मधील विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठे बहुमत मिळाले. इतके की त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या मित्र पक्षांचीही गरज वाटली नाही. एकंदरीत काय तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही एकाच विचारांचे सरकार आले. त्यामुळे आपल्या राज्याचे चित्र वेगळे असायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. आज आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र मागे पडत आहे, कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे, भ्रष्टाचारात महाराष्ट्र पुढे आहे, राज्यात धार्मिक द्वेष पसरवला जातो आहे. राज्याची अशी परिस्थिती कधीच नव्हती.

0
0

Leave a Reply

Realted News