माओवाद शेवटच्या घटका मोजतोय : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : माओवाद्यांचा देशातील मोठा नेता बसव राजूचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माओवाद्यांचा जो देशातला नेता आहे बसव राजू याचे जे आपले सुरक्षा फोर्सेस आहेत त्यांनी त्याचा खात्मा केला आहे. हा असा व्यक्ती आहे ज्याने चंद्राबाबू नायडू यांच्यावरचा हल्ला असेल, छत्तीसगडमध्ये अनेक मंत्री मारले गेले तो हल्ला असेल, 45 आपले सीआरपीएफ जवान असतील त्यांच्यावरचा हल्ला असेल अशा प्रकारचे या ठिकाणी माओवादी मारले गेले आहेत. महाराष्ट्रात देखील अत्यंत महत्त्वाचे माओवादी आत्मसमर्पण झाले आहे. 20 पेक्षा जास्त माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मी असे म्हणेल की आता माओवाद हा शेवटच्या घटका मोजत आहे.









