February 7, 2026 8:51 am

पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल 

‘पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल ‘स्वातंत्र्यदिनी जालन्यात झालेले पोलिसाचे गैरकृत्य

 ‘त्या’ डीवायएसपीच्या पार्श्वभागावर आम्ही लाथ मारू : व्हायरल व्हिडिओवर बच्चू कडूंचा संताप, पंकजा मुंडेंनाही टोला

महाराष्ट्र पोलिसांमध्ये आपले निहीत कर्तव्य न बजावता ‘हिरो’ का संचारला? : वडेट्टीवार

जालना : पोलिस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यानी एका आंदोलनकर्त्याला अगदी फिल्मी स्टाइलने मागून पळत येत लात घातली. लाथ मारल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जनमाणसांत तीव्र संतापजनक प्रतिक्रीया समोर आल्या आहेत. घटनेतील फिर्यादी अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे कौटुंबिक वादातून एका महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. त्यांनी पोलिसांवर पैस खावून आरोपींना सहकार्य करत फिर्यादींना त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच यांतील तपासी अंमलदाराच्या निलंबनाची मागणी केली आहे.
                         प्राप्त माहितीनुसार गोपाल चौधरी नामक व्यक्ति गेल्या मागील 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने परपुरुषासोबत पळून जाऊन लग्न केले आहे. मात्र, तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पैसे खाल्ल्याने कारवाई न झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे येणार आहेत, तेव्हा आम्हाला त्यांना भेटू द्या. अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आंदोलकाने दिला होता.
पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
पोलिस अधिकाऱ्याचा आंदोलनकर्त्याला लाथा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
                           स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तवरील पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेऊन निघाले. पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णीने त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली. एखाद्या चित्रपटात पोलिस जसे उडी मारून लाथ मारतात, तशी डीवायएसपी कुलकणीने भरस्त्यात लाथ मारली. हे मात्र समजू शकले नाही.
                          यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाला लाथ मारण्याचे गैरकृत्य करून, पालकमंत्र्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या पोलिसावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लाथ मारणे हे कर्तव्य बजावत असल्याचे वाटतं का? स्वातंत्र्यदिनी जालन्यात झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोरडी वृत्ती दिसते. पालकमंत्र्यांसमोर आम्ही किती काम करतो हे दाखवताना सामान्य माणसाला लाथ मारणे हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी, म्हणजे पोलिस दलात कुणालाही सामान्य जनतेला लाथ मारण्याची हिंमत होणार नाही. यावर जितेंद्र आव्हाड यांनीही तिव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

                             जालन्यातील विभागाय पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलक शेतकऱ्याला चक्क रस्त्यावर सिनेस्टाईल उडी घेत लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोलीस अधिकार्याचं अशा पद्धतीचं वागणं पाहून नेटीझन्ससह विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले. जर भररस्त्यात पोलीस असं वागत असतील तर पोलीस (POLICE) कोठडीत पोलीस कसं वागत असतील, असा सवालही उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी आमदार रोहित पवारांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता. ‘हा विकृतीचा कळस आहे, याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा’, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
                        जालन्यात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे आल्या असता, एका कुटुंबीयाने आपलं गाऱ्हाणं त्यांच्यापुढे मांडण्यासाठी आंदोलन केले. पोलिसांकडून आरोपीला मदत होत असल्याचे सांगत आंदोलक कुटुंबाने पोलिसांविरुद्ध भूमिका मांडली होती. दरम्यान, पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करत असलेल्या आंदोलक अमित चौधरी यांना डीवायएसी अनंत कुलकर्णी यांनी बुटांसह सिनेस्टाईल लाथ मारली. या घटनेवर आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. आता, आमदार बच्चू कडू यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी आमदार रोहित पवारांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता.
याप्रकरणी आमदार रोहित पवारांनीही तीव्र संताप व्यक्त केला होता.
                      डीवायएसपीला देखील लाथ मारली पाहिजे, त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर आम्ही लाथ मारू, असे म्हणत बच्चू कडू यांनी जालन्यातील व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. मंत्री आला तर मतदारांना लाथ मारणार, निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार. पंकजा मुंडेंना देखील हे समजायला हवं होतं, पंकजा मुंडेंनी देखील निषेध व्यक्त करायला हवा होता, असे म्हणत पंकजा मुंडेंनाही बच्चू कडूंनी टोला लगावला. जगाच्या पाठीवर हुशार असलेले आमचे मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री देखील आहेत, त्यांचे पोलीस असे वागत असेल तर… पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईने काही होणार नाही, त्या शेतकऱ्याकडून त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे, अशा शब्दात बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.

पोेलीसांचे स्पष्टिकरण :

                       या घटनेवर राजकीय वर्तुळात अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या वादानंतर आता पोलीस उपधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. या आंदोलकाने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर राॅकेल टाकल्याने आम्हाला बळाचा वापर करावा लागल्याचे स्पष्टीकरण लात मारणारे पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे. कुलकर्णी म्हणाले, कौटुंबिक वादातून त्यांच्या पत्नीने त्यांना सोडले असून त्यांच्या पत्नीने अमरावती येथील एका व्यक्तीसोबत लग्न केले आहे.
                       त्यामुळे हे प्रकरण त्या जिल्ह्यातले असल्याचे आम्ही त्यांना अनेकवेळा सांगितले होते. तसेच आदल्या रात्री या आंदोलकानेच पोलिस ठाण्यात येऊन एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा दावा देखील कुलकर्णी यांनी केला आहे. परंतु, पोलिस ठाण्यात येऊन जर हल्ला केला होता तर अटक का करण्यात आली नाही, तसेच आंदोलनाला परवानगी तरी कशी मिळाली असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

0
0

Leave a Reply

Realted News