गोंधळ घालायचा असेल तर गावाकडे जा : मनोज जरांगे

मुंबईचे रस्ते मोकळे करा : कोर्टाचे आदेश 

मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका,  मनोज जरांगे

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असे कधी वागत नाही. तसेच गोंधळ करायचा असेल तर गावाकडे जा. कोर्टाच्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच गाड्या आडवा असे न्यायदेवता सांगू शकत नाही, असेही जरांगे यांनी कोर्टाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असे कधी वागत नाही- मनोज जरांगे

                        शांततेत किती बळी घेतले जातात हे देवेंद्र फडणवीस यांना कळत नाही. न्यायदेवता काय सांगते आणि फडणवीस काय करत आहेत. मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना जरांगे म्हणाले, त्यांना मी महत्त्व देत नाही. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले काय?

                        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत आज बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, महाअधिवक्ता उपस्थित होते. या बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला, हे अजूनपर्यंत तरी समजू शकले नाही.

 

0
0

Leave a Reply

Realted News