आरक्षण समाजाला नाही, तर जातीला मिळते : बबनराव तायवाडे
‘मराठा समाजा’ला देणे शक्य नाही; ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची भूमिका नागपूर : भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्याही समाजाला आरक्षण देता येत नाही, तर ते जातीला देता येते. त्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळात मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याचे आवाहन केले होते. मात्र, विदर्भ वगळता इतर कुठल्याही भागातील मराठा समाजाने तेव्हा कुणबी…