आपल्या सैन्याने पाकला गुडघ्यावर झुकवले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
आता मोदींच्या नसांत रक्त नाही, गरम सिंदूर वाहत आहे बिकानेर (राजस्थान) : ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बिकानेरला आले. जिल्हा मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या देशनोकच्या पलाना येथे झालेल्या बैठकीत मोदींनी सुमारे ४० मिनिटे भाषण दिले. पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. …