श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त साहित्यिक सोहळा उत्साहात
तिवसा, ८ सप्टेंबर : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आद्यग्रामगीताचार्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या ९६व्या जयंतीनिमित्त श्री माणिक प्रकाशन, श्रीक्षेत्र वरखेड यांच्या वतीने प्रकाशित सुधाकर राऊत, नांदगाव (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) लिखित ‘उतरंड’ काव्यसंग्रह तसेच दिलीप ठाकरे लिखित ‘प्रार्थना भजन’ संग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूरचे अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. वृद्ध कलावंत साहित्यिक योजना, अमरावती जिल्हा सदस्या सौ. छायाताई दंढारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला कविवर्य बळवंत भोयर (नागपूर), सरपंच रामरावजी रहाटे, प्रा. प्रदीप लोहकरे, हेमंत पोगले, मुकुंद बाबाराव पुनसे, प्रवीण सावरकर यांच्यासह साहित्यिक, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकदादा बेलूरकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेंद्र कुमार बेलूरकर यांनी, तर आभार दिलीप मोहेकर यांनी मानले.
पुस्तकांचे मुद्रणकार्य सद्गुरू प्रिंटर्सचे संचालक उद्धवजी बेलूरकर यांनी पूर्ण केले. कव्हर डिझाईन हितेश तरार (ठाणे) तर मुद्रांकन दिलीप पिस्तूलकर (वर्धा) यांनी केले.

साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बाळू भगत, मंथन बेलूरकर, अभिजित बेलूरकर, राजेश सैनी आणि सुभाष धुर्वे यांनी परिश्रम घेतले.










