नालंदा नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जयंती उत्साहात
सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर | प्रतिनिधी
नालंदा नगर, बँक कॉलनी परिसरात सामाजिक समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जयंती उत्सव समिती, बँक कॉलनी नालंदा नगर सोसायटीतर्फे उत्साहात पार पडला.
बुद्ध वंदना व प्रबोधनपर प्रवचन
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना करून करण्यात आली. वंदनीय भंते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मानवतेचा व समतेचा संदेश दिला.
‘रमाई’वरील लघुनाटिकेने वेधले लक्ष

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिका सादर करण्यात आली.
- रमाईची भूमिका – शोभा गौतम पाटील
- बाबासाहेबांची भूमिका – इंजी. गौतम पाटील
या सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
अंधश्रद्धेविरोधात जनजागृती
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti चे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे यांनी अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या फसवणुकीवर प्रबोधन करत प्रात्यक्षिक सादरीकरण केले.या वेळी चित्तरंजन चौरे, नरेश महाजन, पुष्पा घोडके, वर्षा टेंभेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मानवतावादी विचारांवर प्रबोधन
दिवाकर साखरे यांनी “बाबासाहेबांनी केलेले मानवतावादी परिवर्तन” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही उत्कृष्टरीत्या पार पाडले.

नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
या कार्यक्रमाला बँक कॉलनी परिसरातील ज्येष्ठ सभासद अरविंद बागडे, विनायक कोटांगले , विजया वासनिक, पुष्पा बागडे, कल्पना साखरे, कमला वासनिक, रेखा सावरकर, अस्मिता डोंगरे, निरंजना टेंभुर्णीकर, हिराबाई वासनिक, नलिनी रामटेके, कल्पना उके, अलका मेश्राम, भारती सहारे, पुष्पा खोब्रागडे, मीनाक्षी भोतमांगे, ज्योती कनोजिया, रजनी बागडे, विशाखा रंगारी, स्नेहा भगत, दिवाकर साखरे, मिलिंद पाटील, विलास बोरकर, रवींद्र पारेकर, प्रफुल्ल शेषराव वासनिक, नीलकंठ पाटील, गोविंदा मानवटकर, भोला सहारे ,पुण्या पाटील ,विजया पाटील, मोनिका मेश्राम ,मुक्ता पाटील ,सुषमा गायकवाड ,नमिता गेडाम, कल्पना सहारे,लता पाटील ,सुषमा पाटील, कल्पना बोरकर, विश्रांती जांभुळकर, पी.जी. मानवटकर कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच शंभरहून अधिक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
आयोजकांचा परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपा बागडे, गीतांजली मानके, मिताली गेडाम व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून, समाजात बंधुता आणि समानतेची जाणीव अधिक दृढ करण्यास मदत झाली आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0