मॉडेल हायस्कूलच्या दोन्ही मुलींच्या व्हॉलीबॉल संघांची विभागीय स्पर्धेत धडक!

मॉडेल हायस्कूलच्या दोन्ही मुलींच्या व्हॉलीबॉल संघांची विभागीय स्पर्धेत धडक!

१७ व १९ वर्षांखालील संघांची जिल्हास्तरावर दमदार कामगिरी; अंतिम सामन्यात विजय मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्र

कारंजा (घाडगे), ता. प्र. : स्थानिक मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील या दोन्ही मुलींच्या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

वर्धा येथील क्रीडा संकुलात २५ व २६ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मॉडेल हायस्कूलच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांशी अटीतटीची लढत देत खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, चपळता आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर विजय मिळविला.

दोन्ही संघांच्या या उल्लेखनीय यशामागे क्रीडा शिक्षक महेश वाघ आणि व्हॉलीबॉल प्रशिक्षक पंकज अग्रवाल यांचे मार्गदर्शन तसेच खेळाडूंचा सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला. या विजयामुळे मॉडेल हायस्कूलच्या व्हॉलीबॉल संघांनी आपली यशस्वी परंपरा कायम राखत आता विभागीय स्पर्धेच्या आव्हानासाठी सज्जता दर्शविली आहे.

या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष ॲड. शोभाताई काळे, सचिव संदीप काळे, शाळेचे प्राचार्य प्रवीण होरे, पर्यवेक्षक चंद्रशेखर गिऱ्हाळे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सचिन दिघडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


📢 कामगार टाइम्स* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
परमानंद मुदगल : 📲 9028162217

0
0

Leave a Reply

Realted News