शेतातील घर आगीत खाक; गावकऱ्यांचा प्रयत्न निष्फळ

शेतातील घर आगीत खाक; गावकऱ्यांचा प्रयत्न निष्फळ

पांजरा गोंडी येथील घटना

का टा वृत्तसेवा I परमानंद मुदगल
कारंजा : तालुक्यातील पांजरा गोंडी येथे शेतकरी विजय साठे यांच्या गावानजीक असलेल्या शेतातील घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
,                     साठे यांच्या शेतात उभारलेल्या कच्च्या घराला आज दिनांक.15 बुधवार ला दुपार च्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घरात साठवलेले धान्य, शेतीची अवजारे तसेच दैनंदिन वापरातील वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग अत्यंत भीषण असल्यामुळे ती नियंत्रणात येईपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतकरी विजय साठे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामा केला आहे. यावेळी ग्राममहसूल अधिकारी आर.बी.शिराळे, मंडळ अधिकारी आर.पी.राठोड उपस्थित होते.आगीचे नेमके कारण शोधून योग्य ती कार्यवाही करावी, व नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी.अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

 

0
0

Leave a Reply

Realted News