कळमेश्वरात ‘भारत बंद’ रॅली यशस्वी

कळमेश्वरात ‘भारत बंद’ रॅली यशस्वी

विविध सामाजिक मागण्यांसाठी जोरदार निदर्शने

का टा वृत्तसेवा : दीपक मेश्राम

कळमेश्वर (प्रतिनिधी) : दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा, कळमेश्वर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने कळमेश्वर येथे ‘भारत बंद’ रॅली उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या रॅलीत प्रमुख मागण्यांमध्ये OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करावी, शिक्षणात समानता आणण्यासाठी सख्त UGC इक्विटी कायदा लागू करावा, शिक्षकांना TET परीक्षेतून मुक्तता द्यावी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, बेरोजगारांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच बुद्धगया मुक्तीसाठी ठोस पावले उचलावीत, यांचा समावेश होता.

रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल बोडखे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रमोद ढवळे, राष्ट्रीय पेन्शनर संघाचे तालुकाध्यक्ष दीपक मेश्राम, सचिव छत्रपती वानखडे, मोहपा येथील भारत मुक्ती मोर्चाचे प्रभारी युवराज डोंगरे, कळमेश्वर प्रभारी पुंडलिक बोरकर, भारतीय बेरोजगार मोर्चाचे अध्यक्ष अविनाश बोरकर, क्रांतिकारी गायक अरुण सहारे, तसेच गौतम जांभुळकर, सहयोग तागडे, अजाबराव मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

महिलांमध्ये सविता बोडखे, संगीता सूर्यवंशी, सीमा पाटील, लक्ष्मी वानखडे, लता बागडे, कल्पना मेश्राम, उषा पाटील, मंदा वाहने, विशाखा बोरकर आदींचा विशेष सहभाग होता.

रॅली शांततेत पार पडली असून शेवटी सर्व सहभागी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

0
0

Leave a Reply

Realted News