मोदींच्या आवाहनावरून राज ठाकरे आक्रमक; भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर

मोदींच्या आवाहनावरून राज ठाकरे आक्रमक; भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर

पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावर राज ठाकरेंचे सवाल

मुंबई : पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे, पुढील वर्षभर सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर Raj Thackeray यांनी फेसबुक पोस्टद्वारे मोदी सरकारच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “पेट्रोल-डिझेलच्या वापरात काटकसर करा असे पंतप्रधान सांगत आहेत. मात्र, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळसह विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचार, रोड शो आणि लाखो कार्यकर्त्यांची ने-आण करताना जे कोट्यवधी लिटर इंधन खर्च झाले, त्यावेळी ही काटकसर का सुचली नाही?”

तसेच त्यांनी पंतप्रधानांच्या ताफ्यांवर आणि मोठ्या प्रचारसभांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “देशभर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढल्या जातात, स्वतःवर फुलांची उधळण केली जाते; मग इंधन बचतीचे आवाहन सामान्य जनतेलाच का?” असा सवालही त्यांनी केला.

‘आर्थिक स्थितीवर सरकार मौन का?’

राज ठाकरे यांनी जागतिक खनिज तेलाच्या दरवाढीचा संदर्भ देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. “2008, 2011-12 मधील अरब स्प्रिंग, 2013-14 चा काळ तसेच 2022-23 मध्ये ओपेकने उत्पादन घटविल्यानंतरही खनिज तेलाचे दर प्रति बॅरल 90 ते 100 डॉलरपर्यंत गेले होते. त्यावेळी ना तत्कालीन पंतप्रधान Manmohan Singh यांनी अशी आवाहने केली, ना मोदींनी. मग आता अचानक काटकसरीचे आवाहन का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

देश आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाल्याचा आरोप करताना त्यांनी सरकारवर आर्थिक धोरणांबाबतही टीका केली.

भाजपचे प्रत्युत्तर; “राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे”

राज ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडूनही तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे प्रवक्ते Navnath Ban यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन करताच राज ठाकरे यांच्या पोटात दुखायला लागले. मोदींना सल्ला देण्यापेक्षा त्यांनी आपल्या पक्षाच्या वाढीसाठी आणि धोरणांसाठी एवढा मोठा संदेश लिहिला असता, तर त्याचा अधिक फायदा झाला असता.”

तसेच, “राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहात पाहण्यास तयार नाहीत आणि ते पंतप्रधानांना सल्ले देत आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.


0
0

Leave a Reply

Realted News