“आंबेडकरी विचार सांगत असाल तर अशा कृतीला स्थान नाही,” — मानवांचा सवाल

भूषण गवई–धीरेंद्र शास्त्री भेटीवरून वाद ; श्याम मानव यांची तीव्र टीका

“आंबेडकरी विचार सांगत असाल तर अशा कृतीला स्थान नाही,” — मानवांचा सवाल

नागपूर, प्रतिनिधी : भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्यप्रदेशातील बागेश्वर धाम येथे धीरेंद्र शास्त्री यांची घेतलेली भेट सध्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. या भेटीनंतर सामाजिक वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गवई यांच्यावर तीव्र टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना श्याम मानव यांनी म्हटले की, “भूषण गवई स्वतःला आंबेडकरी विचारांचा मानणारे सांगतात. मात्र जर ते धीरेंद्र शास्त्री यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतील, तर त्यांनी पुढे बाबासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मानव पुढे म्हणाले की, गवई यांचे वडील रा. सू. गवई यांची परंपरा आणि आंबेडकरी विचारांची भूमिका लक्षात घेता ही कृती धक्कादायक आहे. यापूर्वीही दीक्षाभूमीवर काही वादग्रस्त व्यक्तींच्या सत्काराला त्यांनी विरोध केल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्याही काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथे बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानावर टीका होत आहे. “महाराज युद्धाने थकले आणि त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी राज्य अर्पण केले,” असे त्यांनी म्हटल्याने इतिहासतज्ज्ञ व सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

                  एकीकडे गवई यांच्या भेटीमुळे निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोच शास्त्री यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News