“वन्यजीव वाचविणे म्हणजे स्वतःचे अस्तित्व वाचविणे” – प्रा. नितेश राऊत
काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर
मोहपा : वन्यजीव संरक्षण ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज असून परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. वाढते शहरीकरण, अवैध शिकार आणि जंगलतोड यामुळे अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नैसर्गिक वारसा जपण्यासाठी तसेच हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी वन्यजीव संरक्षण अत्यावश्यक आहे. वन्यजीव अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग असल्याने “वन्यजीव वाचविणे म्हणजे स्वतःला वाचविणे होय,” असे प्रतिपादन मुंबई येथील प्रा. नितेश राऊत यांनी केले.

ते मोहपा येथील बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयात आयोजित वन्यजीव संरक्षणाविषयीच्या जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची अध्यक्षता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांनी केली. यावेळी कळमेश्वर येथील वनरक्षक राहुल हलकाने यांनीही विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर डॉ. प्रमोद वडते, प्रा. राजेश झाडे, डॉ. अजीत जाचक, डॉ. धनंजय देवते, डॉ. संजय ठवळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चणकापुरे, प्रा. पवन उमक, प्रा. शुभम वाघ, प्रा. मीनल बैस, प्रा. सविता कावडकर, प्रा. सारिका लांडे, प्रा. प्राची कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिन काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. लीलाधर खरपुरिये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्पना देवळे, अजय अंजनकर, प्रदीप बगडे, रजनी गणोरकर, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे आदींनी सहकार्य केले.
या जनजागृती कार्यक्रमाला वानखेडे महाविद्यालय तसेच न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.













Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0