समाजाच्या विकासात महिलांचे मौलिक योगदान – डॉ. वैशाली टालाटुले
काटा वृत्तसेवा I संजय गणोरकर
मोहपा : स्थानिक बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय, मोहपा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मेटपांजरा येथील प्राचार्या डॉ. वैशाली टालाटुले उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. टालाटुले म्हणाल्या की, आजचा काळ अत्यंत आव्हानात्मक असून बदलत्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रत्येकाने स्वतःचे संरक्षण करण्यास सज्ज राहणे आवश्यक आहे. महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधत समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत “बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले” ही उक्ती विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले. आजची स्त्री ही केवळ भावनिक नसून लढणारी आणि जिद्दी आहे. ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळेच महिलांना आज विविध क्षेत्रांत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे तसेच स्वतःसाठी वेळ काढण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी डॉ. प्रमोद वडते, विनोद तरटे, डॉ. धनंजय देवते, प्रा. डॉ. लीलाधर खरपुरिये, डॉ. संजय ठवळे, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चणकापुरे, प्रा. पवन उमक, प्रा. शुभम वाघ, कल्पना देवळे, हरीश अंजनकर, रजनी अकर्ते, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. विनोद भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन कु. आर्या कळसाईत हिने केले, तर आभार वैष्णवी भोयर हिने मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0