विद्यार्थ्यांचे सुयश : शिष्यवृत्ती परीक्षेत ३ जणांची निवड
कारंजा तालुका : प्रतिनिधी ठाणेगाव (वा), कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा येथील संत भाकरे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (EWS) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वीतील एकूण २७ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यातून अक्षरा निलेश मानमोडे, वेदिका ज्ञानेश्वर आत्राम आणि समीर प्रवीण चौधरी या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक हेमराज चाके तसेच शिक्षक रूपचंद हिंगवे, अविनाश वऱ्हेकर, उमेश रेंघे, नरेश करडे, पंजाब धर्वे, छाया भोयर, जया दलाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच पालकांनीही आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे.









Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0