विधान परिषद निवडणूक : विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषद निवडणूक : दानवेंचा अर्ज; भाजपचे ६ उमेदवार,

सिद्दीकी व गोऱ्हे-बच्चू कडूंचीही उमेदवारी

बच्चू कडू यांचा प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी
                 महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून महायुती व महाविकास आघाडीने आपापले उमेदवार निश्चित केले आहेत. विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांच्या नावाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आघाडीतील तिढा काही प्रमाणात सुटल्याचे चित्र आहे.

शिवसेना (शिंदे गट) कडून नीलम गोऱ्हे व बच्चू कडू यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून झिशान सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून सहा उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

भाजपचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार व प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक).

शिवसेना (शिंदे गट) :
नीलम गोऱ्हे, बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :
झिशान सिद्दीकी

महाविकास आघाडी (ठाकरे गट) :
अंबादास दानवे

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. प्रवेशानंतर बच्चू कडू यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा अधिक रंगली आहे.

उमेदवारी अर्ज प्रक्रियेनंतर आता निवडणुकीच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0
0

Leave a Reply

Realted News